सर्व उत्पन्न गटांत ‘डिजिटल पेमेंट्‌स’चा वापर वाढला – रिपोर्ट

मुंबई – भारतातील घराघरांत डिजिटल पेमेंट पद्धतीचा लक्षणीय स्वीकार करण्यात आला आहे. ही पद्धत केवळ श्रीमंत किंवा शिक्षित वर्गापुरती मर्यादित राहिलेली नाही, असा निष्कर्ष पीपल रिसर्च ऑन इंडियाज कन्झ्युमर इकॉनॉमीने व नॅशनल पेमेंट कार्पोरेशनने केलेल्या सर्वेक्षणामध्ये काढण्यात आला आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत घरातील दोनातील एका घरामध्ये डिजिटल पेमेंटचा वापर केला जात असून, सर्वात गरीब 40% घरांपैकी चारांतील एका घरामध्येही डिजिटल पेमेंटचा वापर केला जातो. परिणामकारक प्रशिक्षण व शिक्षण दिले तर या उपलब्ध असलेल्या मागणीचा चांगला वापर होईल.

डिजिटल पेमेंट्‌सचा अवलंब करण्यासाठी स्मार्टफोन खरेदी केलेला असणे, हा अडथळा आता उरलेला नाही, असे अहवालामध्ये नमूद करण्यात आले. स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण भारतातील श्रीमंत असलेल्या 90% आहे. गरीब असलेल्या घरांमध्ये स्मार्टफोनचे प्रमाण 57% इतके अधिक आहे.

कोणत्याही यूपीआय युजरला यूपीआय पेमेंट करण्यासाठी कोणत्याही बॅंक किंवा पेमेंट ऍपचा वापर करता येऊ शकतो, तसेच युजरना त्यांचा यूपीआय आयडी माहीत असावा, याविषयी जागृती करण्यासाठी वाव आहे. रुपे कार्डाचे प्रमाण केवळ शहरी भागांतच नाही, तर दूरवरच्या गावांमध्येही वाढले आहे.

डायरेक्‍ट बेनिफिट ट्रान्स्फर्स (डीबीटी) डिलेव्हरी सिस्टीम सर्व सहभागींसाठी उत्तम ठरली आहे आणि लॉकडाउनच्या कालावधीत ही सिस्टीम आणखी सुधारली आहे, कारण अंदाजे 85% घरांना त्यांच्या बॅंक अकाउंटवर डीबीटी मिळाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.