लोणावळा – संपूर्ण देशात आणि राज्यात एकमेकांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी लोणावळा नगरपरिषदेच्या विषय समिती निवडणुकीत आघाडी करीत सर्वच्या सर्व सहा विषय समित्या काबीज करीत शिवसेनेला बाहेर ठेवले.
भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा नगरपरिषदेमध्ये मागील चार वर्षांपासून भाजप आणि कॉंग्रेस आघाडी करून सत्तेत आहेत. मात्र गतवर्षी विषय समिती निवडणुकीत अनपेक्षितपणे शिवसेना आणि अपक्षांच्या गटाने तीन समित्या काबीज करीत भाजप-कॉंग्रेस आघाडीला धक्का दिला होता. मात्र यावेळी कोणत्याही प्रकारची जोखीम न स्वीकारता या भाजप-कॉंग्रेस आघाडीने प्रत्येकी तीन प्रमाणे सर्वच्या सर्व सहाही विषय समित्या आपल्या ताब्यात घेतल्या.
मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या पीठासनाखाली लोणावळा नगरपरिषद सभागृहात विषय समिती सदस्य व सभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. त्यांना सहायक म्हणून मुख्याधिकारी रवी पवार यांनी काम पाहिले. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष आरोही तळेगावकर व सदस्य उपस्थित होते.
विषय समिती सभापती व सदस्य निवडी पुढीलप्रमाणे –
सार्वजनिक बांधकाम समिती : पूजा गायकवाड (सभापती) – देविदास कडू, श्रीधर पुजारी, संध्या खंडेलवाल, शिवदास पिल्ले, सिंधू परदेशी, अंजना कडू.
शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक क्रीडा समिती : ब्रिंदा गणात्रा (सभापती) – देविदास कडू, श्रीधर पुजारी, संध्या खंडेलवाल, संजय घोणे, कल्पना आखाडे, माणिक मराठे, अंजना कडू.
स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती : रचना सिनकर (सभापती) – देविदास कडू, श्रीधर पुजारी, संध्या खंडेलवाल, संजय घोणे, सुनील इंगूळकर, नितीन आगरवाल, अंजना कडू.
पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती : सुधीर शिर्के (सभापती) – देवीदास कडू, श्रीधर पुजारी, विशाल पाडाळे, संध्या खंडेलवाल, शादान चौधरी, सुनील इंगूळकर, अंजना कडू.
नियोजन व विकास समिती : आरोही तळेगावकर (उपनगराध्यक्ष पदसिद्ध सभापती), देविदास कडू, श्रीधर पुजारी, विशाल पाडाळे, निखिल कवीश्वर, नितीन आगरवाल, माणिक मराठे, मंदा सोनवणे.
महिला व बालकल्याण समिती : जयश्री आहेर (सभापती) व सेजल परमार (उपसभापती) – देविदास कडू, श्रीधर पुजारी, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी.
स्थायी समिती : नगराध्यक्ष सुरेखा जाधव (पदसिद्ध सभापती) – पूजा गायकवाड, रचना सिनकर, सुधीर शिर्के, ब्रिंदा गणात्रा, आरोही तळेगावकर, जयश्री आहेर, शादान चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. या समितीसाठी भाजपा व कॉंग्रेसने नामनिर्देशन न भरल्याने दोन जागा रिक्त राहिल्या.