“काही समजण्यापूर्वीच फूटपाथवर झोपलेल्या मजूरांना डंपरने…” – प्रत्यक्षदर्शीचा धडकी भरवणारा अनुभव

सुरत – गुजरातमधील सुरतमध्ये  झालेल्या भीषण अपघातात डंपरने रस्त्यालगतच्या फुटपाथवर झोपलेल्या १८ लोकांना चिरडले. यामधील १५ जणांचा मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, सुरतमधील किम-मांडवी रस्त्यावरील फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना एका डंपरने मध्यरात्रीच्या सुमारास चिरडले. हे सर्व मजूर राजस्थान येथील रहिवासी होते. भरधाव असलेल्या डंपरचा चालक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ऊस ट्रॅक्टरने त्याला धडक मारली असता डंपर चालकाचे नियंत्रण सुटले आणि डंपर फुटपाथवर झोपलेल्या मजुरांवर पलटी झाला.

या अपघातावेळी तिथे असलेल्या राजू नावाच्या प्रत्यक्षदर्शीने रात्री नेमकं काय घडलं याविषयी माहिती दिली. अपघातात प्रत्यक्षदर्शीचा भाऊ आणि वहिणी जखमी झाले आहेत. मी अपघात स्थळापासून २५ फूट अंतरावर असल्यामुळे बचावल्याचे राजूने सांगितले.

अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा भाऊ राजूने सांगितले की, आपल्या भावासह सर्व मजुरांसोबत मी पण फूटपाथवरच राहतो. सोमवारी संध्याकाळी ६ वाजता आपले काम संपवून परतलो. त्यानंतर जेवण करुन रात्री ९:३० च्या सुमारास अपघात स्थळापासून २५ फूट अंतरावर झोपण्यासाठी गेलो. भाऊ आणि वहिणी अपघातस्थळीच झोपले होते. रात्री उशीरा काही पडल्याचा मोठा आवाज झाला. डोळे उघडताच काही समजण्यापूर्वीच फूटपाथवर झोपलेल्या मजूरांना डंपरने चिरडले होते. थोडावेळातच मोठ-मोठ्या किंचाळ्यांचा आवाज यायला सुरुवात झाली होती, असं राजून सांगितले.

दरम्यान घटनास्थळी धाव घेऊन आपण भाऊ आणि वहिणीचा शोध घेतला. तेथे अनेक जणांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. शोधाशोध सुरु असताना भावाने आपल्या आवाज दिला. दोघांच्याही डोक्याला गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे राजूने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.