नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा परीक्षा 2019 चा निकाल जाहीर करण्यात आला झाला आहे. या परीक्षेत प्रदीप सिंह हा देशात अव्वल आला आहे. महाराष्ट्रातून अभिषेक सराफ पहिला आला आहे. तर जतिन किशोर दुसऱ्या क्रमांकावर असून प्रतिभा वर्मा तिसऱ्या आणि महिला उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अधिकृत यादी युपीएससीच्या अधिकृत वेसबाईटवर जाहीर करण्यात आली आहे. विविध नागरी सेवा परीक्षा दिलेल्या एकूण 829 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
युपीएससीने सप्टेंबर 2019 मध्ये पार पडलेल्या लेखी आणि फेब्रुवारी-ऑगस्टदरम्यान झालेल्या मुलाखीत आणि व्यक्तिमत्त्व चाचणीच्या आधारे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 829 उमेदवारांची निवड करण्यात आली असून 11 उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान 2019 मध्ये प्रथमच लागू करण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास (EWS) कोट्यातून 78 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
युपीएससीकडून दरवर्षी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि इतर केंद्रीय सेवांसाठी नागरी सेवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाते. दरम्यान 2019 मधील युपीएससी परीक्षा 31 मे रोजी पार पडणार होती. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा 4 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.