UP Cabinet Expansion। आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील योगी सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. प्राप्त माहितीनुसार, राज्य सरकारचा आठवडाभरात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारात सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओपी राजभर, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार दारा सिंह चौहान यांच्या नावाचाही समावेश होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात 8 मंत्र्यांची जागा रिक्त UP Cabinet Expansion।
सध्या मंत्रिमंडळात 8 मंत्र्यांची जागा रिक्त आहे. 5-6 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, असे मानले जात आहे. याशिवाय राष्ट्रीय लोकदलाच्या 9 आमदारांपैकी कोणत्याही एका आमदाराची मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
‘उत्तरप्रदेशात कॉंग्रेस खातेही उघडू शकणार नाही…’; भाजपचा दावा
विधान परिषदेच्या 13 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी भाजपही मंत्रिमंडळ विस्तारावर भर देत आहे, या निवडणुकीत मतदानाची परिस्थिती उद्भवली तर मित्रपक्ष नाराज होऊ नये, म्हणून मंत्रिमंडळ विस्ताराचा घाट घातला जातोय.
वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा UP Cabinet Expansion।
गेल्या वर्षी 2023 मध्ये सुभासप भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाल्यापासून, ओपी राजभर दावा करत होते की त्यांना लवकरच मंत्री केले जाईल. याशिवाय घोसी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचा आणि सपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणारे दारा सिंह चौहान हे देखील सध्या भाजपमध्ये आहेत.
दारा सिंह घोसी जागेवरील पोटनिवडणुकीत पराभूत झाले होते, तरीही भाजपने त्यांना एमएलसी बनवून विधान परिषदेवर पाठवले होते. याशिवाय लोकसभा निवडणुकीपूर्वी जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकदलानेही एनडीएमध्ये प्रवेश केला असला तरी अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या पक्षाच्या 9 आमदारांपैकी कोणालाही मंत्री केले जाऊ शकते. मंत्रिमंडळात आठ पदे रिक्त असल्याने भाजप आपल्या कोणत्याही सहकारी आमदाराला कॅबिनेट मंत्री बनवू शकते असं म्हटलं जातंय.