केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई – केंद्रीय मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतची माहिती स्वतः नितीन गडकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.

“काल मला अशक्तपणा जाणवल्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. तपासणीदरम्यान कोरोना बाधा झाल्याचे समोर आले. सध्या आपणासर्वांच्या शुभेच्छांमुळे माझी प्रकृती ठीक असून मी स्वतःला आयसोलेट केलं आहे.” अशी माहिती त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच भारताने कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येचा ५० लाखांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे रुग्णसंख्या ४० लाखांपासून ५० लाखांपर्यंत पोहचण्यासाठी केवळ ११ दिवसांचा कालावधी लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.