ओळखीचा गैरफायदा : गुंगीचे औषध देऊन विवाहितेवर बलात्कार

पती बाहेरगावी गेला असता त्याच्या मित्राचे कृत्य

लोणी काळभोर (पुणे) – ओळखीचा फायदा उठवून विवाहित महिलेस शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पुणे-सासवड राज्यमार्गावरील एका गावात घडली आहे.

याप्रकरणी 21 वर्षीय पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून गणेश चंद्रकांत डांगे (रा. सोलापूर, पूर्ण पत्ता माहित नाही.) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे पती हे खासगी नोकरीस आहेत. तेथेच गणेश डांगे हा सुमारे 1 वर्षापासून कामास असल्याने त्याच्याशी चांगली ओळख झाली होती. त्यामुळे पतीबरोबर तो त्यांचे घरी येत होता. 30 ऑगस्ट रोजी तिचे पती कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दरम्यान 2 सप्टेंबर रोजी गणेश डांगे याने पीडीतेच्या घरी जाऊन तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. तिने यास नकार दिला. यावर त्याने माफी मागीतली व कोणाला काही सांगू नको असे म्हणाला.

5 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ती घरी असताना गणेश हा शीतपेयाची छोटी बाटली घेऊन आला. पीडितेची पुन्हा माफी मागितली व पेय पिण्यास दिले. पिल्यानंतर तिला गुंगी आली व बेशुध्द झाली. दुसरे दिवशी सकाळी तिला जाग आली. त्यावेळी कपड्यांची अवस्था पाहून तिचे लक्षात आले की, डांगे याने शीतपेयामधून कोणते तरी गुंगीचे औषध देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. झाल्या प्रकारामुळे ती खूप घाबरून गेली. 7 सप्टेंबर रोजी तिचे पती परत आल्यावर त्यांना विश्वासात घेऊन झाला प्रकार सांगितला. त्यानंतर तिची मानसिक स्थिती खराब झाली होती. ती ठिक झाल्या नंतर 15 सप्टेंबर रोजी ऊरूळी देवाची दूरक्षेत्रात जाऊन तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.