OnePlus 8T चे फिचर्स लिक, पहा कधी येणार हा फोन?

मुंबई- चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी वनप्लस आपल्या नवीन डिव्हाईस OnePlus 8T वर काम सुरु आहे. हा  फोन सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जावू शकते.

नवीन फोन OnePlus 8 पेक्षा वेगळा कॅमेरा मॉड्यूल दिले जावू शकते. PriceBaba ने OnLeaks सोबत मिळून फोनची काही रेंडर फोटो शेयर केली आहेत. यावरून हे उघड झाले आहे की, OnePlus 8T मध्ये रॅक्टँग्यूलर कॅमेरा मॉड्यूल देण्यात येणार आहे, असं एका रिपोर्टमधून समजले आहे.

वनप्लस 8T मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, 5 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असणार आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग मिळू शकतो. आतापर्यंत कंपनी 30W वार्प चार्ज चे फीचर देत होती. फोनची किंमत 40 ते 45 हजार रुपयांदरम्यान असू शकते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.