नवी दिल्ली : हरियाणातील करनाल जिल्ह्यात आज पहाटे दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील तरवाडी येथे एका राईस मिलची तीन मजली इमारत कोसळली. या इमारतीत राईस मिलचे कामगार झोपायचे. ढिगाऱ्याखाली अनेक मजूर गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात ४ मजुरांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर २० कामगार जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 5 ते 6 मजूर अजूनही आत असल्याची भीती आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.
#WATCH | Haryana: Several rice mill workers feared being trapped under debris after a three-storeyed rice mill building collapsed in Karnal. Workers used to sleep inside the building. Fire brigade, police and ambulance have reached the spot. Rescue operations underway. pic.twitter.com/AFzN9HDPYw
— ANI (@ANI) April 18, 2023
ढिगाऱ्याखाली दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. लवकरच सर्वांना बाहेर काढले जाईल. असेही पोलीस म्हणाले.
राईस मिलची इमारत कशी पडली हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र तीन मजली इमारत कोसळल्याने मिलच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ही इमारत इतकी जुनी असताना त्यात 200 मजूर का ठेवण्यात आले? असेही विचारण्यात येत आहे.