नवी दिल्ली – वयाच्या ऐन विशीत प्रत्येक तरुण आपलं कॉलेज एंजॉय करून मित्र मैत्रिणीसोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत असतो. या वयात एखादी कंपनी टाकून काम करून कोट्याधीश होण्याचं स्वप्न कदाचितच कोणी पाहत असेल. मात्र आदित पालिचा या तरुणाने हे स्वप्न पाहिलं आणि सत्यात उतरवून दाखवलं. आदित पालिचा त्या कंपनीचे सीईओ आहेत, जिने 2022 मध्ये मूल्यांकन 7300 कोटींचे मोठे उड्डाण घेतले आहे.
विशेष म्हणजे अवघ्या एका वर्षात या मुलाने आपल्या मित्रासोबत कोट्यवधींची कंपनी स्थापन केली. ऑनलाइन किराणा वितरण प्लॅटफॉर्म असलेली (झेप्तो) ही कंपनी दोघा मित्रांनी 2021 मध्ये लाँच केली.
2001 मध्ये मुंबईत जन्मलेल्या आदित पालीचा यांनी वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षांपासून छोट्या मोठ्या उद्योगांबाबत विचार करायला सुरुवात केली होती. त्यांनी गो पूल नावाचा स्टार्टअप देखील सुरू केला. त्यानंतर इंजिनिअरिंग पूर्ण करण्यासाठी तो यूएसमधील स्टॅनफोर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी गेला, परंतु स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्याने अभ्यास अर्धवट सोडला आणि घेतलेला निर्णय सार्थकी लावला.
कंपनीची उलाढाल 1 महिन्यात कोटींवर पोहोचली
आदितने त्याचा मित्र कैवल्य वोहरा यांच्यासोबत एप्रिल २०२१ मध्ये ऑनलाइन किराणा वितरण प्लॅटफॉर्म झेपटो सुरू केले. स्टार्टअप सुरू केल्याच्या 1 महिन्याच्या आत त्यांनी कोट्यवधींची उलाढाल केली. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी 10 मिनिटांत किराणा सामान पोहोचवण्यासाठी हा स्टार्टअप सुरू केला आणि त्यांची संकल्पना यशस्वी ठरली.
2021 मध्ये, दोन्ही मित्रांनी मिळून झेपटो सुरू केले. यासाठी, 2021 मध्ये, त्यांनी 86 किराणा दुकानांशी संबंध प्रस्थापित केले. यामुळे त्यांनी तब्बल 10 लाख ऑर्डर वितरित केल्या. कंपनीच्या लॉन्चच्या 5 महिन्यांत कंपनीचे उत्पादन 570 दशलक्षवर डॉलरवर पोहोचले. या यशासाठी आदित पालीचा आणि कैवल्य वोहरा यांचा ३० वर्षांखालील उद्योजकांच्या हुरुन यादीत समावेश करण्यात आला आहे.
सध्या ही कंपनी तब्बल दहा शहरामध्ये सुविधा पुरवते. तसेच या कंपनीमध्ये तब्बल एक हजारहून अधिक कर्मचारी काम करतात. तीन हजारांहून विविध प्रकारचा माल कंपनी पोहचवते यामध्ये भाजीपाल्यापासून किराणा मालाचा समावेश आहे.क्विक सर्विस ही या कंपनीची खासियत आहे.