Umang 2023 : मुंबईत पोलिसांच्या सन्मानार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ‘उमंग’ (Umang 2023) हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटसृष्टीतील सर्व स्टार्स आले होते. यावेळी बऱ्याच अभिनेत्री या साड्यांमध्ये दिसल्या, तर अभिनेत्यांनी सूट आणि टक्सिडो परिधान केलेले होते.
View this post on Instagram
उमंग 2023 मध्ये सलमान खान, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, विकी कौशल रणबीर कपूर, बॉबी देओल, रणवीर सिंह, हिमेश रेशमिया, सिद्धार्थ मल्होत्रा, ईशान खट्टर,, यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले आहेत. आपल्या ग्लॅमरस अंदाजाने सेलिब्रिटींनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
View this post on Instagram
तर दुसरीकडे शाहरुख खानने (Shah Rukh Khan) आपल्या दमदार एन्ट्रीने तर भाईजानने जबरदस्त डान्सने या इव्हेंटमध्ये चार चाँद लावले. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने पोलीस वॅनवर चढून चाहत्यांसोबत चर्चा केली. या कार्यक्रमादरम्यान सेलिब्रिटींमधील जबरदस्त बॉन्डिंग दिसून आली.
View this post on Instagram
View this post on Instagram