मुंबई : उध्दव ठाकरे हेच महाराष्ट्रातील पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली.
शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांची बैठक मुंबईतील नेहरू सेंटर येथे पार पडली. त्यानंतर शरद पवार यांनी ही घोषणा केली. शरद पावार, उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, संजय राऊत, अहमद पटेल, मल्लिकार्जून खर्गे, केसी वेणुगोपाल, अविनाश पांडे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील अिांण अजित पावार या बैठकीस उपस्थित होते.
NCP Chief Sharad Pawar after Shiv Sena-NCP-Congress meeting: We all have consensus on the name of Uddhav Thackeray as Chief Minister. #Maharashtra pic.twitter.com/UTV9Lrk2c0
— ANI (@ANI) November 22, 2019
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, याबाबत चर्चा सुरू आहे. तीनही पक्षांची पत्रकार परिषद उद्या घेण्यात येईल. सरकार स्थापनेचा दावा कधी करायचा याचा निर्णय आम्ही उद्या घेऊ, असे या बैठकीनंतर शरद पवार यांनी सांगितले.