#Autozone2019 मध्ये चोपडा मोटर्स तर्फे रॉयल इनफिल्डचे वेगवेगळे मॉडेल सादर

दै. प्रभातच्या वतीने आयोजित केलेल्या ऑटो झोन २०१९ मध्ये चोपडा मोटर्स तर्फे रॉयल इनफिल्डच्या वेगवेगळ्या मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले. जगभरात एक पॉवरफुल आणि रुबाबदार मोटारसायकल म्हणून रॉयल इनफिल्डच्या गाड्यांची ख्याती आहे. गेल्या दशकात भारतातील तरुणांकडून या गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्यामुळे रस्त्यावर ही गाडी अनेकदा दिसते. रॉयल इनफिल्ड क्‍लासिक 500 बरीच लोकप्रिय झाल्यानंतर या गाडीचा छोटा व्हर्जन म्हणजे रॉयल इनफिल्ड क्‍लासिक 350 उपलब्ध करण्यात आल्यानंतर या गाडीलाही भारतातून बरीच मागणी आली.

मुळातच या गाडीचा ब्रॅंड उच्च दर्जाचा आहे. त्यातच रॉयल इनफिल्ड क्‍लासिक 350 ला मिळालेल्या रेट्रो डिझाईनमुळे या गाडीचे आकर्षण मूल्य वाढले आहे. रॉयल इनफिल्ड क्‍लासिक 350 मध्ये यूसीई इंजिन 346 सीसीची पॉवर निर्माण करते. या इंजिनची कार्यक्षमता वाढविण्यात आल्यामुळे गाडी मोठी असूनही इंधन कार्यक्षमता उंचावण्यामध्ये यश मिळाले आहे. त्यामुळे सुरक्षित आमि रूबाबदार प्रवासासाठी या गाडीचा वापर वाढू लागला आहे. कारण तुलनेने रॉयल इनफिल्ड क्‍लासिक 350 ही रॉयल इनफिल्ड क्‍लासिक 500 पेक्षा थोडी स्वस्त आणि हलकी पडते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)