#Autozone2019 के. कोठारी तोयटो तर्फे ‘इनोव्हा क्रिस्टा ZX’ सादर

दै. प्रभातच्या वतीने आयोजित केलेल्या ऑटो झोन २०१९ मध्ये के. कोठारी तोयटो तर्फे ‘इनोव्हा क्रिस्टा ZX’ सादर करण्यात अली आहे. इनोव्हा क्रिस्टा हे भारतातील सर्वाधिक खपाचे मल्टिपर्पज व्हेईकल म्हणजे एमपीव्ही असून हे जीडी डिझेल व ड्युअल व्हीव्हीटी-1 पेट्रोल इंजिन प्रकारात उपलब्ध आहे. यामध्ये सिक्वेंशिअल शिफ्टसह सहा सुपर ईसीटी अंतर्भूत आहेत. त्याचबरोबर इकॉनॉमिक आणि पॉवर मोड उपलब्ध करण्यात आल्यामुळे गरजेनुसार वाहन चालविणे शक्‍य होते.


चालकामागील आसनाच्या रांगेत चटकन बदल करण्याची सुविधा उपलब्ध असल्यामुळे मोठ्या कुटुंबासाठी प्रवास करताना आवश्‍यक ती अदलाबदल करता येते. पीच अँड बाऊंस कंट्रोलची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 7 आणि 8 सीटरमध्ये उपलब्ध करण्यात आली असून ग्राहक आपल्या सोयीनुसार निवड करू शकतात. अंतर्गत सजावट आरामदायक असून यामध्ये तीन रंग उपलब्ध करण्यात आले आहेत. ही गाडी सुरू झाल्यापासून उत्तरोत्तर लोकप्रिय होत असल्यामुळे भारतात आणि भारताबाहेरही चिकित्सकांच्या दृष्टिकोनातून अभ्यासाचा विषय झाला आहे. गाडीची किंमत बरीच असूनही ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करून गाडी खरेदी करीत असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.