मुंबई – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडला. आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर नागरिकांनी शिवसेना भवनासमोर पोस्टर झळकावून ठाकरेंना एका आश्वासनाची आठवण करुन दिली आहे.
गेल्या कहाणी दिवसांपूर्वी मुंबईतील मध्यवर्ती भागात असलेल्या आरे कॉलनीतील शेकडो झाडे तोडण्यात आली. त्यानंतर सत्ता आल्यानंतर आरेतील जंगलामध्ये असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालवणाऱ्यांना बघू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
तसेच, सत्तेत आल्यानंतर आरेला पुन्हा जंगल करू असे आश्वासन शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्याचीच आठवण आज उद्धव ठाकरेंना करून देण्यात आली आहे.
यावेळी “आरे बचाव” असे पोस्टर हातात घेऊन नागरिकांनी शिवसेना भवनाबाहेर घोषणाबाजी केली.