#PhotoGallery: शिवतीर्थावरील शपथविधी सोहळ्याचे खास फोटो

मुंबई: मावळतीचा सुर्य व शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला साक्ष ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व आई-वडिलांचे स्मरण करीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. न भुतो, न भविष्यती… असा हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी आणि तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे शिवतिर्थावर अभूतपूर्व अशी गर्दी उसळली होती. उद्धव ठाकरे यांनी शपथ घेताच शिवाजीपार्कवर फटाक्‍यांची आतषबाजी झाली आणि शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here