Udayanidhi Stalin Remarks। निवडणूक आयोग लवकरच देशातील लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता आहे. याबाबत विविध राजकीय पक्ष आपापल्या तयारीत व्यस्त आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते विरोधी पक्षनेत्यांवरही हल्लाबोल करतायेत. या पार्श्वभूमीवर द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पीएम मोदींबद्दल धक्कादायक विधान केलंय. त्यांनी, पंतप्रधान कधीही बोलतात तेव्हा ते खोटेच बोलतात” अशी टीका त्यानी केले. याच विधानावर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय.
भाजपला एकही जागा जिंकता येणार नाही Udayanidhi Stalin Remarks।
द्रमुक नेते उदयनिधी यांनी पंतप्रधानांवर बोलताना, ते (भाजप) डीएमके नष्ट करेल. गेली 60-70 वर्षे जे लोक हे सांगत होते त्यांनीही स्वतःला उद्ध्वस्त केले आहे. प्रिय पंतप्रधानजी, तुमचे आजोबाही द्रमुकचे काही नुकसान करू शकत नाहीत का? आपण डीमकेला स्पर्श देखील करू शकत नाही.” असे म्हणत जहरी टीका केली. तसेच पीएम मोदींना आव्हान देत म्हटले की, ते राज्यात ४० दिवस राहिले तरी भाजपला एकही जागा जिंकता येणार नाही.असे त्यांनी म्हटलं.
भाजपने प्रत्युत्तर दिले Udayanidhi Stalin Remarks।
तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचा पलटवार करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांनी ,”कोण आहेत उदयनिधी स्टॅलिन? तो एक अयशस्वी अभिनेता आहे”. वडील आणि आजोबांचे नाव घेऊन ते राजकारणात उभे राहिले आणि मंत्री झाले. तो पीएम मोदींच्या पायाच्या नखांवरील घाणीएवढेही नाही. घराण्याचे नाव घेऊन ते राजकारणात आले आहेत. त्यांनी काही सामाजिक कार्य केले आहे का? ‘स्टालिन’ आणि ‘करुणानिधी’ या नावांशिवाय तो कोण आहे?” असे म्हणत त्यानी सडेतोड उत्तर दिलंय.