बारामती – बारामती शहर राज्यासाठी विकासाचे मॉडेल ठरले आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्याच हातात आहेत. बारामतीच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.
बारामतीच्या विकासाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक करत त्यांना पाठबळ दिले. बारामती शहरातील अत्याधुनिक बस स्थानक, पोलीस उप मुख्यालय, पोलीस वसाहत तसेच नमो महा रोजगार मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, उपसभापती नीलम गोरे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, आदी मान्यवर उपस्थित होते.
बारामती शहर तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे. यासाठी माहिती सरकारची देखील मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. असे असले तरी राज्यात नंबर एकता तालुका म्हणून बारामतीची मला ओळख निर्माण करायची आहे असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यासपीठावर व्यक्त केला.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीच्या विकासासाठी हात आखडता घेतला जाणार नाही असे आश्वासन अजित पवार यांना दिले. शरद पवार यांच्यासह तसेच अजित पवार यांनी देखील बारामतीचा विकास केला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
अजित पवारांच्या मदतीने चेहरा मोहरा बदलणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बारामती शहराच्या विकासाचे कौतुक केले. बारामती शहरातील बस स्थानक हे एखाद्या विमानतळा सारखे आहे. शहरातील प्रशासकीय व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने सरकारी नसून एखाद्या कार्पोरेट कंपनी सारखी निर्माण करण्यात आली आहेत अजित पवार यांच्या मदतीने राज्यातील पोलीस प्रशासन कार्यालयांचा व निवासस्थानांचा चेहरा मोहरा बदलण्याचा मला देखील मोह होत आहे. अजित पवार यांच्या माध्यमातूनच बारामतीत पश्चिम विभागाचा नमो महा रोजगार मेळावा यशस्वी होत असल्याचे देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केले.