U19 World Cup 2024, India U19 vs South Africa Live Score : आज अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट आहे. या संपूर्ण स्पर्धेत हा संघ अपराजित असून मागील सलग पाच सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. भारतीय कर्णधार उदय सहारनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नमन तिवारीचे संघात पुनरागमन झाले आहे.
IND vs SA Live Score : दक्षिण आफ्रिकेला 30.2 षटकात 118 धावांवर तिसरा धक्का बसला. मुशीर खानने क्रिझवर स्थिरावलेल्या प्रिटोरियसला मुरुगन अभिषेककरवी झेलबाद केले. त्याला 102 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 76 धावा करता आल्या. 31 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 120 धावा आहे. सध्या रिचर्ड आणि ऑलिव्हर क्रीजवर आहेत.
🚨 Toss and Team Update 🚨#TeamIndia win the toss and elect to field in Semi-Final 1.
Here’s our Playing XI for today 💪
Follow the match ▶️ https://t.co/Ay8YmV8iNI#BoysInBlue | #U19WorldCup | #INDvSA pic.twitter.com/m8ZSrGWTvV
— BCCI (@BCCI) February 6, 2024
याआधी राज लिंबानीने घातक गोलंदाजी केली आणि दोन बळी घेतले. त्याने स्टीव्ह स्टॉक (14) आणि डेविड टीगरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. टीगरला खातेही उघडता आले नाही.
दोन्ही संघाचे प्लेइंग-11 :-
दक्षिण अफ्रीका : युआन जेम्स (कर्णधार), क्वेना मफाका, दीवान मराइस, नकोबानी मोकोएना, रिले नॉर्टन, लुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), रिचर्ड सेलेट्सवेन, स्टीव स्टोक, डेविड टीगर, ओलिवर व्हाइटहेड, ट्रिस्टन लुस.
भारत : उदय सहारन (कप्तान), अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, अरावेली अवनीश, सौम्य कुमार पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिम्बानी , नमन तिवारी.