Fighter – अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) ‘फायटर’ या चित्रपटाद्वारे धमाकेदार पुनरागमन केले आहे. नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्यासाठी चांगली ठरली आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्या (Deepika Padukone) ‘फायटर’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असताना, या दोन मुख्य कालाकारांना आता कायदेशीर नोटीस मिळाली आहे.
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर चित्रपट ‘फाइटर’ 25 जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये दोन्ही स्टार्स एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसले होते. मात्र, आता या चित्रपटाविरोधात हवाई दलाच्या अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चित्रपट रिलीजच्या 11 दिवसांनंतर सिनेमातील एका सीनवरून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात दोन्ही स्टार्स रोमँटिक सिन करताना दिसले होते. त्यांचे किसिंग सीन पाहून हवाई दलाचे अधिकारी संतापले आहेत. त्यामुळे त्यांनी चित्रपट निर्माते आणि मुख्य कलाकारांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
किसिंग सीनमुळे भारतीय वायुसेनेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. चित्रपटात हृतिक आणि दीपिका यांच्यातील हा सिन हवाई दलाच्या गणवेशात चित्रित करण्यात आले आहे.
या कारणास्तव अधिकाऱ्याचा यावर आक्षेप आहे. हा अधिकारी विंग कमांडर सौम्या दीप दास ऑफिसर्स मेस आहे, जो आसामच्या तेजपूर एअरफोर्स स्टेशनवर तैनात आहे. त्यांनी निर्माते आणि कलाकारांविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
तिकीट बारीवर ‘फायटर’ची यशस्वी घौडदौड !
हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘फायटर’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोललो तर, चित्रपटाने जगभरात 300 कोटींच्या कलेक्शनच्या जवळ पोहोचले आहे. तर, चित्रपटाने भारतात एकूण 210.3 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने जगभरात 295.3 कोटींची कमाई केली आहे.