वाठार स्टेशन (प्रतिनिधी) – सातारा लोणंद महामार्गावरील पिंपोडे खुर्द हद्दीत कोरेगाव फाट्यावर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन्ही दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला. स्वराज स्वरूप कुमार जानकर (वय २४, रा. पाडेगाव ता. खंडाळा) व सुप्रीम सुभाष शिंदे (वय २४, रा. बलवडी ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास स्वराज जानकर हा बुलेट (एमएच १२ टीई ३००६) वरून सातारा हुन लोणंद दिशेने जात असताना तसेच सुप्रीम शिंदे मोटरसायकलवरुन (एमएच ४५ एएस ३९३४) सातारा दिशेला जात असताना पिंपोडे खुर्द गावच्या हद्दीतील कोरेगाव फाटा नजीक या दोन दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली.
ही धडक एवढी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळतात वाठार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांचे शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथे हलवण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले करीत आहेत.