मुंबई – धूलिवंदन (होळी) आणि रंगपंचमी हा सण आहे मौजमजेचा आणि बागडण्याचा. वसंत ऋतूच्या सौंदर्याची नांदी होळीच्या सणातून वाजू लागते. भारतात होळी साजरी केली जाते रंगांच्या माध्यमातून. एकमेकांच्या चेहऱ्यावर रंग लावून होळीच्या शुभेच्छा देण्याची पद्धत भारताच्या अनेक भागांत आहे.म्हणून या दिवसांमध्ये त्वचेसह केसांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. रंगापासून केसाचे संरक्षण कसं करावं हे आता आपण जाणून घेणार आहोत.
रंग खेळण्यापूर्वी कंडिशनर किंवा हेअर सीरम लावून केसांमध्ये सोडा. हे केसांना उन्हामुळे आणि रंगांमुळे कोरडेपणापासून वाचवते. त्यासोबतच सिरम थोड्या प्रमाणात घ्या आणि दोन्ही तळहातांवर पसरवा आणि केसांमध्ये हलका मसाज करा किंवा तळहातांनी केसांना लावा. खोबरेल तेलानेही केसांना मसाज करू शकता. त्यामुळे केसांवर रंगाचा परिणाम होत नाही.
तेलात लिंबूही टाका. दोन चमचे बदामाच्या तेलात दोन थेंब लॅव्हेंडर तेल, एक थेंब गुलाबाचे तेल आणि दोन-तीन थेंब लिंबाचा रस मिसळा आणि केसांना लावा. यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळेल आणि होळीच्या रंगांपासून ते सुरक्षित राहतील.
केस बांधा – होळीच्या वेळी केस उघडे ठेवू नका. पोनीटेल किंवा वेणी बनवा. तसे, केसांना स्कार्फने झाकूनही होळी खेळता येते. तुम्ही होळीला मिळणारी टोपी किंवा स्विमिंग कॅप देखील घालू शकता.
संवेदनशील टाळूची काळजी घ्या- जर तुमची टाळू संवेदनशील असेल, तर होळी खेळण्यापूर्वी लिंबाच्या रसाने हलका मसाज करा, ज्यामुळे त्यावर हानिकारक रंगांचा प्रभाव कमी होईल.त्वचेवर किंवा केसांवर उपचार सुरू असल्यास, होळी खेळणं टाळा आणि तुमच्या वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला घ्या.