पुणे – येरवडा कारागृहातून दोन कैद्यांनी पलायन केले आहे. आज पहाटे साडेपाचच्या दरम्यान दोन आरोपी पळून गेले आहे.
हर्षद सय्यद (वय 20, रा.कासारवाडी), आकाश बाबुराव पवार (वय 26. रा.काळेवाडी)असे कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कैद्यांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची नोंद आहे.
दरम्यान, आकाश पवार या कैद्याने याआधीही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. आकाश पवार यासोबत आणखी दोन आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा कट रचला होता. वैद्यकिय तपासणीकरिता नेल्यावर त्यांनी गोंधळ घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.