नगर – महामारीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना करोना संक्रमणापासून संरक्षण होण्यासाठी शरद पवार विचार मंचच्या वतीने एन 95 मास्क, हॅन्ड ग्लोज व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याकडे सुपुर्द केले.
यावेळी अयान सय्यद, मुजिर सय्यद, अर्जुन बडेकर, मतीन जहागिरदार, मोहन कड, अमोल कांबळे, विजय शिंदे आदी उपस्थित होते. अल्ताफ सय्यद म्हणाले की, शहरात करोनाचे संक्रमण दिवसेदिंवस वाढत आहे. मनपा कर्मचारी हॉटस्पॉट भागासह शहरात विविध ठिकाणी सेवा देत असतात. त्यांच्या सुरक्षिततेसाठी एन 95 मास्क, हॅन्ड ग्लोज व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे.
तसेच शरद पवार विचार मंचच्या वतीने गरजूंना अन्न-धान्यासह किराणा वाटप सुरु आहे. पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालयात सॅनीटायझेशन कक्ष बसविण्यात आले. तसेच चौका-चौकात पहारा देणाऱ्या पोलिसांना पाणी, सॅनीटायझरचे वाटप केले.