पुणे – मराठ्यांचा दैदिप्यमान इतिहास जगासमोर आणण्यासाठी झपाटलेल्या सहस्त्र दुर्गवीर मारूती गोळे यांनी यावर्षी जिंजी ते सिंहगड ही मोहीम आखली आहे, उद्या ते सिंहगडवर पोचणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित दुसरी मोहीम पुर्नत्वाच्या मार्गावर आहे.
सहस्त्र दुर्गवीर अॅड. मारूतीआबा गोळे यांच्या ११०० किलोमीटर जिंजी ते सिंहगड मोहीमेतील १०२६ किलोमिटर अंतर त्यांनी दुपारी भुईंज येथे पुर्ण केले. यावेळी रॉबिन हिंगणेकर, नितीन जाधव, सागर झिंजूर्के ,आणि अमित काळे या सर्व गिर्यारोहकांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत आणि अभिनंदन केले. उर्वरित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
पहिला शिवछत्रपतींचा आग्र्याचा प्रवास आणि दुसरा शिवपुत्र राजाराम छ्त्रपतींचा जिंजी प्रवास . यापैकी पहिला आग्र्याचा प्रवास दुर्गवीर मारूती गोळे यांनी पुर्ण केला होता. आता त्यांचा जिंजीचा प्रवास देखील पुर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने समस्त भारतीयांना ही मोहीम सिंहगडावरून अर्पण करण्याचा दुर्गवीर ॲड.मारूती गोळे यांचा मनोदय आहे.