मुंबई – मुंबई महापालिकेतील बिले मंजूर करण्यासाठी एका एनजीओकडून लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे असे महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल वॉर्डातील सतीश दगडखैर आणि नितीन साबळे यांनी एनजीओ चालवणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याकडून ८४००० रुपयांचे बिल काढण्यासाठी १२००० रुपयांची मागणी केली होती. स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत या स्वयंसेवी संस्थेने काम केले होते.
त्याच्या बिला पोटी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना दगडखैर आणि साबळे यांना साकीनाका येथील सफेदपुल परिसरात एसीबीच्या सापळ्यात अटक करण्यात आली. या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या संबंधात स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीने सांगितले की, आम्ही डिसेंबरमध्ये स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून आमची निविदा स्वीकारल्यानंतर काम केले होते. मात्र, दोन अधिकारी आमचे बिल काढण्यासाठी लाच मागत होते आणि आमचा छळ करत होते.