मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 या वर्षासाठीचा 59954.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. यावर्षीचा अर्थसंकल्प गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.5 टक्के इतक्या मोठ्या स्वरूपाचा आहे. सध्या या महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे.
मार्च 2022 मध्ये नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्य सरकारने बीएमसी प्रशासक म्हणून नियुक्त केलेले महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना प्रशासनाने हे अंदाजपत्रक सादर केले.
1985 नंतर ही दुसरी वेळ आहे की महापालिका प्रशासनाने नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासकाला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात शहरातील अनेक महत्वाच्या प्रकल्पांसाठी तरतूदी करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका गेले सुमारे वर्षभर खोळंबल्या आहेत.