Vijay Wadettivar letter to Election Commission : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सुधाकर शिंदे यांची तत्काळ बदली करावी, यासाठी त्यांनी हे पत्र लिहिले आहे. नियमबाह्य पद्धतीने हे अधिकारी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होऊनही पदावर आहेत, त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करावी, असे पत्र वडेट्टीवार यांनी लिहिले आहे.
मुंबईतील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. | Vijay Wadettivar letter to Election Commission
वडेट्टीवार म्हणाले की, चहल यांची बदली होत नाही. त्याचबरोबर अश्विनी भिडे, वेलारासू हे वरिष्ठ सनदी अधिकारी देखील त्याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे हे आएएएस नसताना देखील मोठ्या पदावर आहेत. हे अधिकारी मर्जीतील असल्याने ते पक्षपातीपणा करू शकतात. हे अधिकारी निधी वाटपात दुजाभाव करू शकतात. निवडणुकीदरम्यान प्रभाव पाडू शकतात. या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त केले पाहिजे. | Vijay Wadettivar letter to Election Commission
मुंबई महापालिका आता भ्रष्टाचाराचा अड्डा झाली आहे. मुंबई साफ करण्याचं काम काही अधिकारी करत आहेत. सरकारने याला वेळीच आळा घातला पाहिजे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना सरकारने पाठीशी घालू नये, असे खडे बोल देखील वडेट्टीवार यांनी सुनावले आहेत.
महाराष्ट्र राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिले पत्र!
मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, सुधाकर शिंदे यांची तात्काळ बदली करावी ही मागणी या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.
नियमबाह्य पद्धतीने हे अधिकारी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊनही पदावर… pic.twitter.com/zpjNVXDjNQ
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 6, 2024
दरम्यान, तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात दिला होता. दरम्यान, पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने त्यांना बदली आदेशातून वगळावे, अशी विनंती राज्य सरकारने केली होती. मात्र, मंगळवारी आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळली आहे. | Vijay Wadettivar letter to Election Commission