Raj Thckeray । लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आगामी लोकसभेच्या दृष्टीने मनसेने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोनच दिवसांपासून मनसे-भाजप युतीच्या हालचालींना वेग आला आहे. राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. । Raj Thackeray Melava
आज देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंची महत्वाची बैठक पार पडली आहे. आगामी लोकसभेच्या दृष्टीने मनसेने रणशिंग फुंकले असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा 9 एप्रिल रोजी मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे.
या मेळाव्याला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. राज ठाकरे यांची भूमिका ऐकण्यासाठी पक्षाचे हजारो कार्यकर्ते मुंबईत एकत्र यावेत, या उद्देशाने 9 एप्रिल 2016 ला मुंबईत पहिला पाडवा मेळावा आयोजित केला होता. या पाडवा मेळाव्याच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी सुरू केला होता.
सध्या एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिवाजी पार्कवर राज गर्जना होणार असल्याने मनसे अध्यक्ष काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे यंदाचा पाडवा मेळावा खास ठरणार आहे. । Shivtirtha