न्यूयॉर्क : इलॉन मस्क यांनी ट्विटर आपल्या हातात घेतल्यापासून त्यात वेळोवेळी नवनवीन बदल केले आहेत. त्यातच आता ट्विटरची चिमणी आणि लोगो बदलण्यात आला आहे. वास्तविक इलॉन मस्क ट्विटरचा लोगो म्हणजेच बर्ड हटवण्याच्या तयारीत आहे. याची माहिती देण्यासाठी त्याने ट्विट केले होते.
मस्कने केलेल्या ट्विटमध्ये , “लवकरच आम्ही ट्विटर ब्रँडला आणि हळूहळू सर्व पक्ष्यांना हटवू.” दुसर्या ट्विटमध्ये, इलॉन मस्क म्हणतो की, “आज रात्री एक छान X लोगो पोस्ट केला गेला तर, आम्ही तो उद्या जगभरात लाइव्ह करू.” असे म्हटले होते. याआधीही मस्कने ट्विटरच्या धोरणात अनेकवेळा बदल केले आहेत, ज्याचा थेट परिणाम जगभरातील वापरकर्त्यांवर झाला आहे.
And soon we shall bid adieu to the twitter brand and, gradually, all the birds
— Elon Musk (@elonmusk) July 23, 2023
आता इलॉन मस्कने ट्विटरचा लोगो बदलण्याचे संकेत दिल्याने अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, नवीन लोगो कसा असेल? असा अंदाज वर्तवला जात आहे की इलॉन मस्कने त्याच्या बहुतेक कंपन्यांच्या नावांमध्ये आणि लोगोमध्ये X या शब्दाचा समावेश केला आहे. त्यामुळे ट्विटरच्या नवीन लोगोवर देखील Xचे वर्चस्व असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Elon Musk said he would change Twitter’s logo: ‘And soon we shall bid adieu to the twitter brand and, gradually, all the birds’ https://t.co/MDVCEByk6c pic.twitter.com/MkvJaCuPje
— Reuters (@Reuters) July 23, 2023
अलीकडेच इलॉन मस्कने लॉन्च केलेल्या एका आर्टिफिशिअर कंपनीला xAI असे नाव देण्यात आले आहे. त्याच वेळी मस्कच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पोरेशन कंपनीचे नाव देखील स्पेसएक्स आहे. आता मस्क देखील X या शब्दाने ट्विटर बर्ड लोगो बदलण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिलंय की, लोगो कसाही असेल पण त्यात X असेल. इलॉन मस्कने रविवारी सकाळी 9.30 वाजता हे ट्विट केले आहे. या नव्या घोषणेनंतर त्याचे ट्विट आतापर्यंत तीन कोटीहून अधिक यूजर्सनी पाहिले आहे. या ट्विटवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आणि लोगोसंदर्भात विविध मीम्स शेअर केले.