नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील वाद हा सोशल मीडियापर्यंत पोहचला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अमूलने चीनविरोधी एक कार्टून प्रकाशित केले होते त्यावरून मोठे रामायण घडले. अमूलने तीन जून रोजी चीनविरोधात एक कार्टून प्रकाशित केले होते. त्यामुळे ट्विटरने त्यांचे अधिकृत खाते ब्लॉक केले होते. अमूलचे खाते बंद केल्यानंतर ट्विटरवर नेटकऱ्यांनी चीन आणि ट्विटरवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर लागेचच ट्विटरने अमूलचे खाते उघडत सेफ्टी प्रोटोकॉलमुळे खाते ब्लॉक केल्याचे म्हटले.
#Amul Topical: About the boycott of Chinese products… pic.twitter.com/ZITa0tOb1h
— Amul.coop (@Amul_Coop) June 3, 2020
मागील दोन दिवसांपासून ट्विटरवर #AmulVsChina असा हॅश टॅग ट्रेंड होत आहे, नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर अमूलचे ट्विटर खाते पुन्हा एकदा सुरू झाले आहे. पण चीनच्या संबंधित एक कार्टून ट्वीट केल्यानंतर अमूलचे खाते Restricted झाल्याचा मेसेज आला होता. ट्वीटरचे असे म्हणणे आहे की, सिक्युरिटीच्या दृष्टीने पाहिले असता त्यांची ही नेहमीचीच प्रक्रिया आहे. तर ट्वीटरने अमूल कंपनीचे अकाउंट ब्लॉक केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
अमूल कंपनीने तीन जून रोजी क्रिटिव्ह कॅम्पेन Exit The Dragon? असे होते. त्यामध्ये चीनच्या प्रोडक्ट्सवर बहिष्कार टाकण्यासंबंधित एक कार्टून पोस्ट करण्यात आले होते. त्याखाली About the boycott of Chinese products…असे कॅप्शनही लिहण्यात आले होते. अमूलच्या कार्टूनमध्ये लाल आणि पांढऱ्या ड्रेसमध्ये आइकॉनिक अमूल गर्लला एका ड्रॅगनसोबत लढून वाचताना दाखवण्यात आले आहे. याच कार्टमध्ये बॅकग्राहउंडला चिनी व्हिडियो-शेअरिंग मोबाइल अॅप टिकटॉकचा लोगा दाखवण्यात आला आहे. त्याशिवाय मोठ्या अक्षरात अमूल ‘Made In India’ ब्रँड असे लिहलेले आहे.