नगर -मनुष्याला जगण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नाही. ऑक्सीजन देण्याचे काम झाडे करीत असतात, त्यांच्याकडून मिळणाऱ्या श्वासासाठी वृक्षांना जगविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वृक्षरोपणाने पर्यावरणाचा समतोल साधला जाणार असल्याने सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रत्येकाने एक झाड लावण्याचे आवाहन, हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी केले आहे.
भिंगार येथील छावणी परिषदेच्या भगवान गौतमबुध्द जॉगिंगपार्क येथे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जागतिक पर्यावरण दिना निमित्त वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी रमेश वराडे, अशोक लोंढे, राजू कांबळे, रमेश त्रिमुखे, जालिंदर बोरुडे, अजय खंडागळे, विकास निमसे, अब्बास शेख, सुंदरराव पाटील, सुधाकर चिदंबर, विशाल भामरे, गौरख शेरकर, नितीन पाटोळे, फारुक शेख, ऍड. योगेश तोडमल आदी उपस्थित होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर फिजीकल डिस्टन्सचे पालन करुन व तोंडाला मास्क लाऊन हा उपक्रम घेण्यात आला. तसेच राजू कांबळे यांचा वाढदिवस देखील वृक्षरोपणाने साजरा करण्यात आला. हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य आपला वाढदिवस देखील वृक्षरोपणाने करतात. ग्रुपच्या वतीने अनेक ठिकाणी झाडे लावण्यात आली आहे. तसेच प्रत्येक रविवारी ग्रुपचे सदस्य लावलेल्या झाडांना जाऊन स्वत: पाणी देत असतात. ही मोहिम वर्षभर चालू असून, याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रुपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.