वीस हजार वंचित बालकांची दिवाळी उजळणार

नगर – यंदाच्या दीपोत्सवात 20 हजार वंचित बालकांना लहानशी दिवाळी भेट देऊन त्यांची दिवाळी उजळण्याचा संकल्प सामाजिक संस्था आणि संघटनांनी केला आहे. या उपक्रमाचे हे पंधरावे वर्ष आहे. प्रत्येकी 1 स्नानाचा आणि कपड्याचा साबण ,सॉफ्ट टूथब्रश आणि पेस्ट ,100 एम एल केस तेल, सुगंधी उटणे , नेलकटर आणि कंगवा, या साहित्याचा एक संच असलेली दिवाळी भेट या उपक्रमास प्रतिसाद म्हणून देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

नगरमधील विविध झोपडपट्ट्यातील बालकांसाठी कार्यरत बालभवन प्रकल्प,शेवगाव येथील उचल फाउंडेशन, श्रीगोंदा येथील फासेपारधी समूहासाठीचे बाबा आमटे वसतिगृह, व्यसनाधीन आणि लालबत्ती भागातील बालकांसाठी चे आमळे (तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) येथील सार्थक सेवा संघ, मुंबई- रायगड- ठाणे जिल्ह्यात काम करणारी प्रेरणा संस्था, कर्जत तालुक्‍यातील स्नेहप्रेम आणि संकल्प विद्यार्थी वसतिगृह, काष्टी ता श्रीगोंदा येथील आरंभ बालनिकेतन, बेळगाव येथील स्पर्श प्रकल्प, प्रौढ मानसिक विकलांग व्यक्तींसाठी कार्यरत स्नेह संकल्प (जि. बुलढाणा), जय मातादी बालगृह (तालुका कर्जत) ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील स्नेहघर आणि फोंडाघाट येथील युवाग्राम इत्यादी 26 नवोदित संस्था आणि उपक्रमांतील बालकांना ही दिवाळी भेट पोहोचविली जाणार आहे. स्नेहालय आणि अनामप्रेम परिवाराने या उपक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)