“युटोपियन’कडून शेतकऱ्यांना मिळणार 347.7 लाख

पुणे – मंगळवेढ्यातील युटोपियन शुगर्स लि. या साखर कारखान्याने गळीत हंगाम 2018-19 या कालावधीत गाळप केलेल्या ऊसास प्रति मे. टन 55 रु. प्रमाणे होणारी रक्‍कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. ऐन दिवाळीच्या सणाकरिता रक्‍कम रुपये 55 प्रमाणे होणारी एकूण रक्‍कम 347. 7 लाख इतकी रक्‍कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

युटोपियन शुगर्सने गळीत हंगाम 2018-19 मध्ये 632311 मे. टन इतक्‍या ऊसाचे गाळप करीत 10. 15 टक्‍केइतक्‍या सरासरी रिकव्हरी ने 641600 क्विं.इतकी साखर उत्पादित केली आहे. युटोपियन शुगर्स ने आत्तापर्यंत ऊस उत्पादकांना 2250 प्रमाणे होणारी 14227 लाख रुपये यापूर्वीच ऊस उत्पादक यांना अदा केलेली आहे.

मंगळवेढा व परिसरामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. चालू वर्षी ऊस उत्पादकांकडे कमी पावसामुळे इतर पिकांच्या माध्यमातून नेहमी प्रमाणे मिळणारे आर्थिक उत्पन्न मिळाले नाही

Leave A Reply

Your email address will not be published.