काश्मीरवर ट्विट; मलालाने आधी पाकिस्तानात जाऊन दाखवावे – हिना 

नवी दिल्ली –  शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती आणि शिक्षण अधिकारासाठी काम करणारी पाकिस्तानची मलाला युसुफझाई हिने काश्मीरमधील मुलींच्या शिक्षणावर ट्विट केले होते. मलालाच्या ट्विटवर नेमबाज हिना सिद्धू हिने संताप व्यक्त केला आहे.

हिनाने म्हंटले कि, काश्मीर पाकिस्तानला देण्यात यावा, असे तुमचे म्हणणे आहे का? कारण तेथे तुमच्याप्रमाणेच मुलींच्या शिक्षणाच्या चांगल्या संधी आहेत. पाकिस्तानमधील शिक्षणामुळे तिच्या जीवाला कसा धोका निर्माण झाला होता, याची आठवण हिना सिद्धूने मलाला युसूफझईला करून दिली. तसेच ती म्हणाली कि, तुम्ही तुमचा देश सोडला आणि परत कधीही गेला नाही. आधी तुम्ही पाकिस्तानात जाऊन एक उदाहरण दिले पाहिजे, असेही हिनाने सांगितले.

दरम्यान, मलाला युसुफझाई म्हंटले होते कि, मी यूएनजीएतील नेत्यांना आवाहन करते की, काश्‍मीरमध्ये शांततेसाठी काम करा, काश्‍मिरींचा आवाज ऐका आणि मुलांना सुरक्षित शाळेत जाण्यास मदत करा, असे ट्‌विटमध्ये म्हटले. काश्‍मीरमधील विद्यार्थ्यांप्रती चिंता व्यक्त केली. गेल्या 40 हून अधिक दिवसांपासून ही मुले शाळेत गेलेली नाहीत. भीतीपोटी आपल्या घराबाहेर पडत नसल्याचे तिने ट्विटमध्ये म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)