पुणे – शिवसेनेने (shivsena) संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Brigade) युती केल्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र, या युतीवर भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी जोरदार टीका केली आहे. ( tushar bhosale on shivsena sambhaji brigade coalition ) ‘हे कसले उद्धव ठाकरे हे तर यु-टर्न ठाकरे’ अशी टीका तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
दरम्यान, शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेची वाटचाल नेमकी कशी असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. आगामी राजकीय वाटचालीसाठी शिवसेनेने आता संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना याबाबतची घोषणा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाईसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखील उपस्थित होते.