नवी दिल्ली – अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुक असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अन्य इच्छुक निकी हेले यांच्या नावाचा अपभ्रंश करून त्यांची खिल्ली उडवली आहे.
निक्की या नावाऐवजी ट्रम्प यांनी निम्रा असे नाव उच्चारून त्यांची खिल्ली उडवली. निक्की हेले या भारतीय वंशाच्या असल्यामुळे त्यांच्या मूळ नावाचा उल्लेख करून ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये त्यांच्या अमेरिकेशी नसलेल्या नात्याचा संदर्भ अधोरेखित केला. निम्रा हेले याभारतातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्याच्या कन्या असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
निक्की हेले यांनी दोनच दिवसांपूर्वी आपण ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखालील उपाध्यक्ष म्हणून काम करणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्याचा संदर्भ देऊन ट्रम्प यांनीही निक्की हेले यांना उपाध्यक्ष म्हणून आपल्या सरकारमध्ये सहभागी करून घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे.