नाशिक : त्रिपुरी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमेचा उत्सव दि. 7 नोव्हेंबर रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात प्रामुख्याने सर्व प्रमुख देवस्थानांचे आवार हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळले. ऐतिहासिक परंपरा असलेल्या नाशिक शहरातील सुप्रसिद्ध काळाराम मंदिर येथेही हा उत्सव साजरा करण्यात आला.
यानिमित्त श्रीरामाच्या गाभाऱ्यामध्ये आरास करण्यात आली होती. या पावन पर्वावर हजारो भाविकांनी देवदर्शनाचाही लाभ घेतला. “डिजिटल प्रभात’चे वाचक सुधीर पुजारी यांनी पाठवलेली ही छायाचित्र खास वाचकांसाठी…