रेडा – इंदापूर येथील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती महोत्सव समितीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी नगरसेविका राजश्री मखरे, संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंदे, प्रा. अशोक मखरे, नगरसेवक गजानन गवळी, दादासाहेब सोनवणे, मुकुंद शिंदे, जयंती समितीचे अध्यक्ष संदेश सोनवणे, उत्तम गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
त्याच बरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते सतीश सागर यांनी प्रास्ताविक केले.