नवी दिल्ली – आंध्रप्रदेशमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. करोनाबाधित रुग्णाचा मृतदेह जेसीबीतून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महानगरपालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
आंध्रप्रदेश येथील श्रीकाकुलम जिल्ह्यात ७० वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी मृताच्या नातीने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलवले. आणि तेथूनच त्यांच्या मृतदेहाची अवहेलना सुरू झाली. महानगरपालिकेचे कर्मचारी पीपीई किट घालून मृताच्या घरी पोहचले. मात्र, मृतदेह ऍम्ब्युलन्समधून न नेता जेसीबीमधून समशानभूमीत नेला.
#WATCH Andhra Pradesh: Body of a 70-year-old person who died of #COVID19 being disposed of using a proclainer by Palasa municipal authorities in Srikakulam yesterday.
Palasa Municipal Commissioner & Sanitary Inspector have been suspended, says Srikakulam District Collector. pic.twitter.com/NCcMrxtRmL
— ANI (@ANI) June 27, 2020
दरम्यान, हे प्रकरण श्रीकाकुलमच्या जिल्हाधिकाऱ्यांना समजल्यानंतर शहर आयुक्त व स्वच्छता निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री कार्यलयाने याप्रकरणाची दाखल घेत अमानुष कृत्य म्हणत पीडिताला घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रोटोकॉलचे पालन केले गेले नाही, असे म्हंटले आहे.