Travis Head storm hits Chinnaswamy : आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी एका वेगळ्याच टचमध्ये असल्याचे दिसत आहे. आता ट्रॅव्हिस हेड इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात SRH साठी शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. SRH च्या डावाच्या 12 व्या षटकात विजय कुमार विशाकच्या चेंडूवर चौकार मारून त्याने अवघ्या 39 चेंडूत शतक पूर्ण केले. 100 धावा करण्यासाठी त्याने 9 चौकार आणि 8 गगनचुंबी षटकारही मारले. त्याने अवघ्या 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि 41 धावांच्या खेळीत 102 धावा केल्या.
ट्रॅव्हिस हेड आता आयपीएलच्या चालू मोसमात शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी विराट कोहली, जोस बटलर आणि रोहित शर्मा यांनीही शतके झळकावली होती. IPL 2024 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो खेळाडू आहे. त्याच्या आधी विराटने 67 चेंडूत शतक, रोहित शर्माने 61 चेंडूत शतक आणि जोस बटलरने 58 चेंडूत शतक झळकावले होते.
ट्रॅव्हिस हेडने 39 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि यासह तो आयपीएलच्या इतिहासातील चौथे जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या बाबतीत डेव्हिड मिलर (38), युसूफ पठाण (37) आणि ख्रिस गेल (30) त्याच्या पुढे आहेत.
ट्रॅव्हिस हेड आता SRH साठी सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी, हैदराबादसाठी सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता, ज्याने 2017 मध्ये KKR विरुद्ध 43 चेंडूत शतक झळकावले होते. आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज होण्याचा विक्रमही ट्रॅव्हिस हेडच्या नावावर आहे. त्याच्या आधी हा विक्रम ॲडम गिलख्रिस्टच्या नावावर होता, ज्याने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना 42चेंडूत शतक झळकावले होते.
IPL 2024 : एका IPL सामन्यातून चीअरलीडर्स किती कमावतात ? तुम्हालाही जाणून वाटेल आश्चर्य….
आयपीएल इतिहासातील सर्वात वेगवान शतक….
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा खेळाडू म्हणजे ख्रिस गेल, ज्याने 2013 मध्ये आरसीबीकडून खेळताना केवळ 30 चेंडूत शतक झळकावले होते. त्यानंतर सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज युसूफ पठाण आहे. 2010 मध्ये त्याने अवघ्या 37 चेंडूत शतक झळकावले होते. सर्वात वेगवान शतक ठोकण्याच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा झंझावाती फलंदाज डेव्हिड मिलरही पुढे आहे. 2013 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना मिलरने 38 चेंडूत शतक झळकावले होते.