IPL 2024 (Mumbai Indians and Sunrisers Hyderabad Match 55, Playing XI) : आयपीएल 2024 चा 55 वा सामना मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सोमवार, 6 मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना काहीच वेळाच म्हणजे संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स दुसऱ्यांदा सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. या सामन्यात मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्याचा प्रयत्न करेल तर हैदराबादला आपले स्थान मजबूत करायचे आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल (Toss Update) हा मुंबई इंडियन्स संघाच्या बाजूनं लागला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत सनरायझर्स हैदराबाद प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्याने सांगितले की, या सामन्यात त्यांचा संघ एका बदलाने खेळताना दिसेल. अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी मिळाली आहे. गेराल्ड कोएत्झी या सामन्यात दिसणार नाही. त्याच वेळी, मयंक अग्रवाल हैदराबादच्या प्लेइंग 11 मध्ये परतला आहे, तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे.
🚨 Toss 🚨@mipaltan win the toss and will bowl first against @SunRisers
Follow the Match ▶️ https://t.co/iZHeIP3ZRx#TATAIPL | #MIvSRH pic.twitter.com/6wwk8e5nmU
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2024
MI vs SRH : दोन्ही संघांची Playing 11 खालीलप्रमाणे
मुंबई इंडियन्स : इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा. ( इम्पॅक्ट सब : नेहल वढेरा, शम्स मुलानी, शिवालिक शर्मा, देवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड.)
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॉन्सन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन. ( इम्पॅक्ट सब : मयंक मार्कंडे, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, जयदेव उनाडकट, उमरान मलिक.)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या चालू आवृत्तीत मुंबई इंडियन्सची आतापर्यंतची कामगिरी प्रभावी ठरली नाही. मुंबई इंडियन्सने या मोसमात आतापर्यंत 11 पैकी 8 सामने गमावले आहेत. तो सध्या आयपीएल 2024 गुणतालिकेत 6 गुणांसह 9व्या स्थानावर आहे. दुसरीकडे हैदराबादने सुरुवातीपासूनच आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली. संघाने 10 सामने खेळले, त्यापैकी 6 जिंकले आणि 4 सामने गमावले. त्याचे 12 गुण आहेत. त्यांच्या शेवटच्या सामन्यात हैदराबादने गुणतालिकेत अव्वल असलेल्या राजस्थानचा थरारक सामन्यात अवघ्या 1 धावांनी पराभव केला होता. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर, सनरायझर्स हैदराबाद आता मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध विजय मिळवून गुणतालिकेत आपले स्थान भक्कम करण्याचे लक्ष्य ठेवेल. या मोसमात त्यांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे.
दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद आणि मुंबई यांच्यात आतापर्यंत 22 सामने खेळले गेले आहेत. यातील हैदराबादने 10 सामने जिंकले तर मुंबईने 12 सामने जिंकले आहेत.