Cheerleader Salary In IPL : इंडियन प्रीमियर लीगचा 17 वा हंगाम सुरू असून चाहत्यांमध्ये या टी-20 लीगबद्दलचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. सामना पाहण्यासाठी विक्रमी संख्येने चाहते मैदानावर येत आहेत. लोकप्रिय क्रिकेटपटूंसोबतच त्यात ग्लॅमरचा टचही पाहायला मिळत आहे.
स्पर्धेची रंजकता वाढवण्यासाठी मागील वर्षापासून म्हणजेच IPL 2023 पासून चीअरलीडर्स याच पुनरागमन झाले आहे. चीअरलीडर्स त्यांच्या शानदार डान्स स्टेप्सने चाहत्यांचे मनोरंजन करतात. गेल्या काही हंगामात, कोविड निर्बंधांमुळे, चीअरलीडर्स आयपीएलमध्ये दिसल्या नाहीत, परंतु आता मागील आयपीएल हंगामापासून त्या परत आल्या आहेत.
आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात प्रत्येकाने चीअरलीडर्स पाहिल्या असतील. आपापल्या संघाचे फलंदाज जेव्हा षटकार आणि चौकार मारतात आणि गोलंदाज विकेट घेतात तेव्हा नाचणे आणि मनोरंजन करणे हे त्यांचे काम असते. पण तुम्हाला माहित आहे का की, हे चीअरलीडर्स एका मॅचसाठी किती पैसे घेतात? तुम्हाला माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला या बातमीव्दारे माहिती देणार आहोत….
प्रत्येक सामन्यासाठी किती पैसे? (IPL Cheerleaders Earning per match )
आयपीएलमध्ये भाग घेणारे बहुतेक चीअरलीडर्स परदेशातील आहेत तर काही भारतीय चेहरेच दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल चीअरलीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी 14-17 हजार रुपये मानधन मिळते. चेन्नई सुपर किंग्स, पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स सारखे संघ चीअरलीडर्सना प्रति सामन्यासाठी 12,000 रुपये देतात असे क्रिकफॅक्ट अहवालात म्हटले आहे. तर मुंबई इंडियन्स आणि आरसीबी त्यांच्या टीमच्या चीअरलीडर्सना 20 हजार रुपये देतात. कोलकाता नाइट राइडर्स (KKR) चीअरलीडर्सना सर्वाधिक रक्कम देते, जी सुमारे 24 हजार रुपये आहे.
तर बोनस देखील मिळतो….
एका सामन्यासाठी निश्चित पगाराव्यतिरिक्त, आयपीएल सामन्यातील चीअरलीडर्सना कामगिरीच्या आधारे बोनस देखील मिळतो. जर संघांनी सामना जिंकला तर संबंधित चीअरलीडर्सना बोनस देखील दिले जातात. याशिवाय या चीअरलीडर्सना राहण्यासाठी चांगली जागा आणि जेवणासारख्या इतर अप्रतिम सुविधाही दिल्या जातात.
चीअरलीडर्सची निवड कोणत्या आधारावर केली जाते?
आयपीएल चीअरलीडर्स म्हणून नोकरी मिळवणे सोपे नाही. त्यांची निवड अनेक मुलाखती आणि चाचण्यांनंतर केली जाते. आयपीएल चीअरलीडर्सना मोठ्या जनसमुदायासमोर नृत्य, मॉडेलिंग आणि परफॉर्म करण्याचा अनुभव आवश्यक असतो.