मुळशीमध्ये शिवसेनेच्या वतीने धगधगत्या मशाल चिन्हाचे जल्लोषात स्वागत
पौड – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’, असे नाव उद्धव ठाकरे गटाला देण्याचा तात्पुरता निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ठाकरेंना ‘मशाल’ चिन्ह देण्याचाही निर्णय आयोगाने सोमवारी कळवला. या निर्णयाचे स्वागत करत मुळशीतील शिवसेनेच्या वतीने पौड तहसील कार्यालय आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिळालेल्या मशाल प्रज्वलित करून गद्दारांनी चिन्ह गोठवले, खुद्दारांचे रक्त पेटवले अशा घोषणा देण्यात आल्या.
अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना रिंगणात उतरणार असल्याने आयोगाकडून पक्ष नाव आणि चिन्ह कोणते आणि कसे मिळते, याकडे शिवसेनेचे लक्ष होते. शेवटी उद्धव ठाकरे यांना त्यांनी सुचवलेल्या तीन नावांपैकी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले. तर मशाल हे चिन्ह मिळाले असल्याने मुळशीतील शिवसेनेच्या वतीने उत्साहात मिळालेल्या मशाल चिन्हांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाश बलकवडे, भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, जि. प. सदस्य सागर काटकर, आबासाहेब शेळके, ज्ञानेश्वर डफळ, हनुमंत सुर्वे, दिलीप गुरव, ज्येष्ठ नेते नामदेव टेमघरे, अविनाश कानगुडे, नरेश भरम, अमित कुडले, विभागप्रमुख शिवाजी बलकवडे, भाऊ गोरे, दिनेश सोनार, अरुण रानवडे, पांडुरंग सावंत, राजाभाऊ सातपुते, माऊली ढोकळे, नवनाथ भायगुडे, हनुमंत पवार, वसंत ठोंबरे, पांडुरंग गवारी, दत्तात्रय ठोंबरे, सौरभ सांळुके, सुशील तारू, मयुर रानवडे, यश पिंगळे, आदी शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.