बाबुर्डीच्या सुपुत्राची एशिया-ओशनिया कोर्फबॉल चॅम्पियनशिपसाठी निवड
सुपे – बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी केलेल्या एकाट्विटला तत्परतेने प्रतिसाद देत त्यांनी भारतीय संघाच्याखेळाडूचा पासपोर्ट अवघ्या काही क्षणात हातात मिळालाआणि त्याच्या निवडीचा व परदेशात खेळण्यासाठीजाण्याचा मार्गही मोकळा केला. त्यामुळे प्रणव पोमणे याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
बाबुर्डी (ता. बारामती) गावातील सुपुत्र तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामतीचा विद्यार्थी प्रणव पोमणे याची थायलंड येथे एशिया-ओशनिया कोर्फबॉल चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघातून निवड झाली. त्याला परदेशी जाण्यासाठी पासपोर्टची गरज होती. परंतु पासपोर्ट हातात मिळण्यासाठी बराच अवधी लागेल.
पासपोर्ट मिळाला नाही तर स्पर्धेची संधी जाईल, असा प्रश्न प्रणवला सतावत होता. त्यानंतर प्रणव याने आपले बंधू बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी प्रणवला पासपोर्ट मिळण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मदतीची याचना केली. त्यानंतर सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पासपोर्टबाबत एक ट्विट केले.
दरम्यान पासपोर्ट विभाग, तसेच पासपोर्ट अधिकारी डॉ. अर्जूनदेवरे व खासदार सुप्रिया सुळे यांनी त्याची तातडीने दखल घेतली. अगदी दोन तासातच ही प्रक्रिया पूर्णकरीत डॉ. देवरे यांनी प्रणवला थेट कार्यालयातचबोलावून घेतले आणि त्याच्या हातात पासपोर्ट दिला. यासुखद धक्क्याने प्रणवलाही भरून आले. यावेळी ज्ञानेश्वर पोमणे यांनी डॉ. देवरे व खासदार सुळे यांचे आभार मानले.