टोकियो – भारताची महिला मुष्टियुद्धपटू पूजा राणीने टोकियो ऑलिम्पिकच्या मुष्टियुद्ध स्पर्धेच्या आपल्या पहिल्याच फेरीतील सामन्यात विजय मिळवला. पूजाने अल्जेरियाच्या चाईब इचार्क हिचा पराभव केला.
पूजाला 10 पैकी 10 गुण मिळाले असून पूजा 75 किलो वजनी गटात खेळताना इचार्कचा पराभव करत तीने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. आता पदक निश्चित करण्यासाठी तिला दोन सामने जिंकावे लागणार आहेत.
आशियाई विजेती पूजा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली 75 किलो वजनी गटातील पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
तिने उपउपांत्यपूर्वी फेरीच्या बुधवारी झालेल्या लढचीच इचार्कला 5-0 असे पराभूत केले. मे महिन्यात झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते व ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती.