Tokyo Olympics : पी.व्ही. सिंधू बाद फेरीत

टोकियो – भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीत सातत्य कायम राखताना बाद फेरीत प्रवेश केला. आता तिला पदक निश्‍चित करण्यासाठी आणखी दोन विजयांची गरज आहे.

सिंधूने महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात हॉंगकॉंगच्या चेंग गॅंनचा पराभव केला. सिंधूने दोन गेममध्येच हा सामना जिंकला. गॅंगचा पराभव केला. सुरुवातीपासूनच सामन्यात आघाडी घेतलेल्या सिंधूचा हा यंदाच्या ऑलिम्पिकमधील दुसरा विजय असून, या विजयासह तीने बाद फेरीत प्रवेश केला आहे.

ग्रुप स्टेज मॅचमध्ये इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा पराभव केल्यानंतर सिंधूने ऑलिम्पिक स्पर्धेत दुसऱ्या विजय मिळवला. ग्रुप स्टेजमधील बुधवारी झालेल्या लढतीत सिंधूचा हॉंगकॉंगच्या चेंग गॅंनसोबत सामना झाला. यावेळी सिंधूने जबरदस्त प्रदर्शन करत सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली.

सिंधूने पहिली गेम 21-9 अशा फरकाने जिंकला. 15 मिनिटे चाललेल्या पहिल्या गेममध्ये गॅंनकडून झालेल्या चुकांचा सिंधूने फायदा घेत बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये गॅंनने चांगलीच लढत दिली. मात्र, अनुभव कमी पडल्याने तिला ही गोमही गमवावी लागली. ही गेम सिंधूने 21-16 अशी जिंकत सलग दुसरा विजय साकार केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.