पाटण – आज दुपारी एक वाजता कोयना धरणाचे दोन फुटांनी सहा वक्र दरवाजे वर उचलून कोयना नदी पात्रात 11 हजार 427 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यापूर्वी धरणाच्या पायथावीज गृहातून 2 हजार 100 क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्यात आले होते. पायथा वीजगृह व सांडव्यावरून असे एकूण 13 हजार 527 क्युसेक पाणी कोयनानदी पात्रात सोडण्यात आले आहे.
कोयनानदी पात्रात सोडण्यात येणार्या पाण्यामुळे जुना संगमनगर (धक्का) पूल , मुळगाव पूल पाण्याखाली गेल्याने दक्षिणेकडील गावांचा पाटणशी जवळचा मार्ग बंद झाला आहे. कोयना धरणातून सोडण्यात येणार्या पाण्यामुळे कोयना व कृष्णा नदीकाठच्या 238 गावांना कोयना धरण व्यवस्थापन कडून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.