मान्सून ऑफर्सचा लाभ घ्या (भाग-2)

मान्सून ऑफर्सचा लाभ घ्या (भाग-1)

वाहतूक सुविधा
ज्या भागात आपण फ्लॅट खरेदी करत आहोत, तेथे परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात जमा होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरते. पावसाळ्यात रस्त्याची स्थिती, वाहतूक कोंडीची स्थिती कशी असते, हे देखील जाणून घ्यावे. घराकडे जाताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात, हे आपल्याला पावसाळ्यात कळते. म्हणूनच घर बुक करण्यापूर्वी पाऊस सुरू असताना प्रस्तावित सोसायटीकडे चक्कर मारावी, जेणेकरून वास्तव समजण्यास मदत मिळेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाटाघाटी करा
जर आपण बिल्डरच्या प्रोजेक्‍ट आणि फ्लॅटची गुणवत्ता पारखून घेतली असेल तर फ्लॅट खरेदी करताना वाटाघाटी करणे सोपे जाते. सध्या बिल्डरकडे मागणीचा तुटवडा आहे. अशा स्थितीत आपण घराची बेस्ट प्राइज मिळवू शकतो. वाटाघाटी करताना घरात आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करावी. किचन ट्रॉली, किचनमधील चिमणी, फर्निचर आदींबाबत बिल्डरशी बोलणी करावी. आपला सिबिल स्कोर चांगला असेल तर बॅंका देखील कमी व्याजदरात कर्ज देण्याची तयारी दर्शवितात.

ऑफरची खातरजमा करणे
पावसाळ्यात बाजार थंड असतो. त्यामुळे बॅंका आणि बिल्डर हे ग्राहकांच्या प्रतीक्षेत असतात. खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी अनेकप्रकारचे ऑफर देत राहतात. अनेक बिल्डर हे फ्लॅट बुक करण्याबरोबरच पार्किंग, मॉड्यूलर किचन, एसी साहित्य आदींची ऑफर करत राहतात. एसबीआयने देखील 8.40 टक्के व्याजदराने होमलोन देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे फ्लॅट बुक करण्यापूर्वी ऑफरची चाचपणी करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)