नारायणगाव -जुन्नर तालुक्यातील खानापूर येथे सलग दुसऱ्या दिवशी आज (दि. 25) दोन करोना पॉझिटिव्ह व खामुंडी गावात एक जण करोनाबाधित आढळला आहे. खामुंडीत रुग्णांची संख्या 7 झाली असल्याची माहिती तालुका प्रशासन यांनी दिली. दरम्यान जुन्नर तालुक्यात करोना बाधित रुग्णांची संख्या 47 वर पोहोचली आहे.
खानापूर गाव व परिसरातील भाग 14 दिवसांसाठी कंन्टेमेंट जाहीर केला आहे. गावात सर्व व्यवहार बंद असून गावातील व्यक्ती बाहेर जाणार नाही व बाहेरील व्यक्ती गावात प्रवेश करणार नाही असे आदेश प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या वतीने दिले आहेत.